प्रदेश काँग्रेसकडून निर्णय
*💫सावंतवाडी दि.२८-:* प्रसारमाध्यमांमधून काँग्रेस पक्षाच्या व नेतृत्वाच्या विरोधात पक्षाची हानी होईल अशी चुकीची विधाने केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा चिटणीस महेश उर्फ बाळू अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . तसे पत्र जिल्हा प्रभारी तथा माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी दिले असून त्याची प्रत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे याना देण्यात आली आहे
