*💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीची सरपंच सोडत आज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. सेजल ठाकूर या शाळकरी मुलीच्या हातून चिठ्ठ्या काढत ही सोडत पार पडली आहे. या सोडत मध्ये २१ ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात आरक्षण पडले असून, या मध्ये चोकुळ, कोलगाव, आंबोली, न्हावेली, भालावल, कास, वेत्ये, सातार्डा, देवसू दाणोली, गेळे, दांडेली, आंबेगाव, शिरशिंगे, सांगेली, आरोस, डेगवे, सरमळे, तळवणे, ओटवणे, विलवडे आणि कवठणी येथे पडले आहे. तर सर्वसाधारण महिला आरक्षण सातुळी बावळट, चराठा, वेर्ले, सावरवाड, रोणापाल, नेतर्डे, कुणकेरी, पडवे माजगाव, मळगाव, कलबिस्त, निरवडे, धाकोरे, नाणोस, माजगाव, कोनशी दाभोळी, कारीवडे, भोमवाडी, तिरोडा, असनिये, आजगाव, माडखोल या २१ ठिकाणी पडले असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये इन्सुली, सोनुर्ली, मडूरा, गुळदुवे, ओवळीये, किनळे, पारपोली, वाफोली, मळेवाड या ९ ग्रामपंचायत मध्ये पडले असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण तळवडे, तांबोळी, नेमळे, साटेली तर्फे सातार्डा, सातोसे, आरोंदा, बांदा, पाडलोस या ८ ग्रामपंचायत मध्ये पडले आहे. तर अनुसूचित जाती साठी डिंगणे व निगुडे या दोन ग्रामपंचायतीत आरक्षण पडले असून, अनुसूचित जाती महिला साठी केसरी फणसवडे आणि शेर्ले या दोन ग्रामपंचायतीत आरक्षण पडले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर
