जलक्रीडा व्यवसायिकांसाठी उद्या पासून बोट सुरक्षितता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी
राज्यसरकार कडून जलक्रीडा व्यावसायिकांसाठी बोट सुरक्षितता प्रशिक्षण कार्यशाळा दि २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी 9.30 वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे आयोजित केली असून या कार्यशाळेचा जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केले आहे

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री मोंडकर यांनी म्हटले आहे की, चालू पर्यटन हंगामात जलक्रीडा व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी राज्यसरकार मार्फत जलक्रीडा व्यावसायिकांना बोट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यावेळी पर्यटन संचानालयाचे अधिकारी श्री हनुमंत हेडे , जिल्हाधिकारी श्रीमती के .मंजुलक्ष्मी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन श्री संदीप भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन होणार आहे

या वर्षी जलक्रीडा व्यवसाय सुरु करण्यासाठी पर्यटन संचानालय नवी मुंबई यांची परवानगी आवश्यक असणार आहे यांसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ हा सदर परवानगी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी स्थानिक जलक्रीडा व्यावसायिक व प्रशासन यामध्ये समन्वयकाची भूमिका बजावत असून जल पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित सेवा कशी देता येईल प्रशासन,पर्यटक व स्थानिक प्रशासन यांच्यामधील समन्वय कसा साधता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत जेटस्की, बनाना, बंपर, स्पीडबोट , नौका विहार , वॉटर स्कुटर ,पॅरॅसिलिंग तसेच स्कुबा डायव्हिंग अश्या जलक्रीडा व्यवसायाशी निगडित असणाऱ्या व्यावसायिकांनी सदर कार्यशाळेस उपस्थिती दर्शवावी असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page