⚡कणकवली ता.२२-: श्रावण सोमवारच्या निमित्ताने शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सोमवार हा श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार असल्याने कोकणची काशी तिर्थक्षेत्र श्री देव कुणकेश्वरचे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यातील अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. यावेळी लाखो भाविक येतात. यावेळी कुणकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने शिवसेना नेते संदेश पारकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी ट्रस्ट अध्यक्ष श्री.लब्धे, उपाध्यक्ष श्री.धुवाळी, श्री.संजय वाळके, श्री.भुजबळ, श्री.गणेश वाळके, श्री.सचिन जोइल आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना नेते संदेश पारकर यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन
