जनहित कक्षाच्या जिल्ह्यातील नेमणुका लवकर जाहीर करा

*मनसे जनहित व विधी कक्ष प्रदेशाध्यक्ष अँड किशोर शिंदे यांच्याकडे सावंतवाडी दौऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.२७-:* मनसे जनहित व विधी कक्ष प्रदेशाध्यक्ष ॲड किशोर शिंदे आज सावंतवाडी दौऱ्यावर आले असताना मनसेचे उपजिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, ॲड राजू कासकर, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव विठ्ठल गावडे, सुनील आसवेकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी जनहित कक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका लवकरच जाहीर कराव्यात अशी पदाधिकाऱ्यांनी मागणी देखील त्यांच्याकडे केली आहे. यावेळी शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केलेल्या व तालुक्यातील कामाचा आढावा घेतला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, दत्ताराम गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page