⚡कणकवली ता.१४-: भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हाच्या बांधकाम कामगार व घरेलू कामगार, ईश्रम कामगार आणि सर्व कामगार यांनी आपल्या प्रश्नांसाठी वाचा फोडण्यासाठी उद्देशाने 17 ऑगस्ट 2022 रोजी ठिक 10 वा. ओरोस फाटा येथुन जिल्हाधिकारी कार्यालयात व सरकारी कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे भव्य मोर्चामध्ये सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सत्यविजय जाधव यांनी केले आहे.
आपण कामगार संघटना म्हणून सिंधुदुर्ग जिल्हात काम करत आहोत कामगारांवर होणारे अन्याय दूर करून सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देऊन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात प्रत्येक कामगास जोडगे हा आपला उद्देश आहे.आज कामगार हा सामाजिक सुरक्षीततेपासून अलिप्त राहीला असून कामगारांना देय ठरणारे कायदेशीर फायदे देण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे त्याचप्रमाणे अधिकारी वर्गाची हेकेखोरी वाढली असून अधिकारी मर्जीप्रमाणे वागत आहेत व कामगारांवर अन्याय करत आहेत.आज कामगारांसाठी कामगार कायदे असून नसल्यासारखे आहेत. अधिकारी कामगार कायद्याची अंमलबजावणी होण्याचा दुष्टीने कारवाई करताना दिसत नाही म्हणून आपण आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहोत असे आवाहन भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सत्यविजय जाधव यांनी केले आहे
