मळेवाड येथे गव्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरीवर्ग चिंतेत

वनविभागाने तात्काळ दखल घेण्याची शेतकऱ्यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: मळेवाड येथील पानाचे भोम सड्यावरील शेतात सध्या गव्या रेड्यांचा उपद्रव वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन गाव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पानाचे भोम सड्यावरील शेतात शेतकऱ्यांनी सध्या भुईमूग, भातशेती, नाचणी पिकाची शेती केली आहे. सध्या शेती चांगली होत असताना गव्या रेड्यांच्या कळपाने मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळविले आहे. नुकतीच वर आलेली भाताची रोप या गवारेड्यांकडून तुडविली जात आहे. येथील शेतकरी दिवसरात्र शेतीची राखण करतात, मात्र शेतकऱ्यांची नजर चुकवत हा गव्यांचा कळप येऊन शेताची नासधूस करत आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, याबाबत लवकरात लवकर वनविभागाने तात्काळ दखल घेऊन,शेतीचे पंचनामे करून,गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

You cannot copy content of this page