आजगाव माळ्यारवाडी येथील एकाची गळफास लावून आत्महत्या

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद

वेंगुर्ले ता.३०-: आजगाव माळ्यारवाडी, ता. सावंतवाडी येथील रहिवासी विश्वनाथ सिताराम पांढरे ( वय ४०) हे आज सकाळी ७.१५ वा. जोत माळ्यारवाडी येथे फणसाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. याबाबत वेंगुर्ले पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
याबाबत दिगंबर सहदेव पांढरे यांनी वेंगुर्ले पोलिस स्थानकात खबर दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.डी.पाटील, पोलिस उपनिरीक्षक व्ही.ए. केसरकर, पोलिस हवालदार रमाकांत दळवी, पोलिस नाईक राऊळ यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस रमाकांत दळवी हे अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page