महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवा

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस भास्कर परब यांची मागणी

⚡कुडाळ ता.३०- : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आपल्या बेताल वक्तव्यानी अपमान केला आहे, त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी राज्यपाल पदावरून हटवा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस भास्कर परब यांनी केली आहे.

परब म्हणाले, कोश्यारी यांनी संविधानीक असलेल्या राज्यपाल पदाची शान घालवली असून,ते महाराष्ट्र द्वेष्टे असून यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राला अपमानित करणारी वक्तव्ये कोश्यारीनी केली आहेत, अशा या राजकीय भूमिकेतून वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना केन्द्र सरकारने अद्याप त्यापदावर का ठेवले,आता तरी पंतप्रधानांनी राज्यपालांना हटवावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस करत असून महाराष्ट्र व मराठी माणसांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीतर्फे जाहीर निषेध करत असून,कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागून आपला महाराष्ट्रातील राजभवनातील मुक्काम हलवावा,अशी मागणी परब यांनी केली आहे,

You cannot copy content of this page