⚡वेंगुर्ले ता.२६-: जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था नीट राखता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने पोलिसदलाने सिंधुदुर्गातील शहरे व गावांमध्ये रहदारीच्या व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत. असेच कॅमेरे निवती बंदरावर बसविण्यात आले आहेत.
पण हे व मेरे ज्या केबलने जोडण्यात आले आहेत, ती कमकुवत असल्याने म्हापण – निवती मार्गावर जागोजागी तुटून रस्त्यावर पडलेली आहे. काही ठिकाणी ही केबल लोंबकळत पडली आहे. वाटेवर अडथळा नको म्हणून लोकांनी ती गुंडाळून एकत्र करून ठेवली आहे. त्यामुळे या बंद कॅमेऱ्यांचा कोणताच उपयोग प्रशासनाला होत नाही.
