⚡सावंतवाडी ता.२४-: केंद्र शाळा मळगाव ब्राम्हण पाट या शाळचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीराम उर्फ भाऊ कांबळी यांनी गेली अनेक वर्षे प्रशालेसाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल व्यवस्थापन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीराम कांबळी यांचा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पदाचा कार्यकाळ संपल्या बद्दल त्यांचा निरोप समारंभ व सत्कार शाळेत पार पडला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन सातार्डेकर, मुख्याध्यापिका सीमा चव्हाण, शिक्षक श्रीकृष्ण ठाकूर, सायली गोसावी, सुषमा नेमळेकर, सौ. नेमळेकर, सौ. कुडव, जोशी गुरूजी व पालक उपस्थित होते. यावेळी कांबळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भविष्यातही आपण ज्या ज्या वेळी शाळेकडून माझ्यासाठी साद येईल त्या त्या वेळी त्या सादेला माझ्याकडून सकारात्मक प्रतिसाद असेल, असे कांबळी यांनी सांगि तले. मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम म्हणाले, श्रीराम कांबळी यांनी प्रत्येक कार्यक्रमात मदत केली. भविष्यातही त्यांची मदत लागेल, असे सांगितले. जोशी गुरूजींनी सर्वांचे आभार मानले.
