बँ. नाथ पै सेवांगण मालवण येथे योग शिबिराचे आयोजन

⚡मालवण ता.२२-: बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ते ७ ऑगस्ट पर्यंत पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात आले आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा संध्याकाळी ५ ते ५.३० व ५.३० ते ७ यावेळेत योग शिबिर तसेच 4 ते 6 आँगस्ट पर्यंत सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ५ ते ७ अशा दोन सत्रात तसेच दि. ७ रोजी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत शिबिर होऊन त्याच दिवशी समारोप सोहळा होणार आहे.

या संदर्भात महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांनी ऑनलाईन सभा घेतली. यावेळी सभेला सहराज्य प्रभारी रमाताई जोग, जिल्हा प्रभारी नर्मदा पटेल, जिल्हा महामंत्री रश्मी अंगणे, जिल्हा कोषाध्यक्ष तृप्ती तोरस्कर, जिल्हा संघटन मंत्री दिपश्री खाडिलकर, जिल्हा संघटनमंत्री प्रणाली मराठे, जिल्हा युवती प्रभारी श्वेता गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वर्षा गावकर, संपर्क प्रमुख व तहसील प्रभारी वर्षाराणी अभ्यंकर मालवण, संपर्क प्रमुख प्रियाताई कोचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या जीवनाला निरोगी व सर्वांग सुंदर ठेवण्यासाठी तसेच योगाचा प्रचार व प्रसार व्हावा व ह्या राष्ट्रधर्म कार्या विषयी जनजागृती होऊन संपूर्ण समाज आरोग्य संपन्न व्हावा हा या शिबिरामागचा मूळ उद्देश आहे. या शिबिराला बालक, युवक, युवती, महिला, पुरुष तसेच सर्व वयोगटातील साधकानी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी तहसील प्रभारी
सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर-९४०३५६२६५२, ऋतुजा केळकर-९४२०४२३७९०, अर्चना हर्डीकर-९४२०२१०७५९ यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page