सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले व्यवहार मराठीतून करावेत

*प्रांतधिकाऱ्यांच्या पत्राद्वारे सुचना : मनसेच्या मागणीला यश

*💫सावंतवाडी दि.२२-:* मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रांताधिकारी यांना महाराष्ट्र राज्यात अधिकारी-कर्मचारी यांनी मराठीत संभाषण व लेखी व्यवहार करावे यासाठी मनसेच्यावतीने पत्र देण्यात आले होते. सदर निवेदनाची प्रांतांनी दखल घेत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले व्यवहार मराठीतून करावेत अशा सूचना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील सर्व बँक कार्यालयांना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या मागणीला यश आले आहे, अशी माहिती माजी शहर अध्यक्ष आशीष सुभेदार यांनी दिली.

You cannot copy content of this page