*येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या स्थितीस नगराध्यक्ष जबाबदार राहणार

*शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले मत; रवी जाधव यांची घेतली उपोषण स्थळी जाऊन भेट*

*💫सावंतवाडी दि.२२-:* गेले चार दिवस सावंतवाडीतील व्यवसायिक रवी जाधव हे उपोषण करत असून, नगराध्यक्षांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांनी साधी विचारपूस देखील केली नाही.‌ आजपर्यंत सावंतवाडी शहराला अनेक नगराध्यक्ष लाभले आहेत. परंतु, स्वतः ला सुशिक्षित समजणारे हे नगराध्यक्ष अशिक्षित निघाले. असा टोला शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी लगावला आहे. आपल्याला व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी व अनधिकृतपणे नगरपालिका प्रशासनाने जप्त केलेल सामान परत मिळावे अशी रवी जाधव यांनी मागणी केली आहे. मात्र, याची साधी दखल सुद्धा नगराध्यक्षांनी घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात सावंतवाडीत जी परिस्थिती उद्भवेल त्याला सर्वस्वी नगराध्यक्ष जबाबदार राहतील असे मत शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. आज शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, यांनी उपोषण स्थळी भेट देत रवी जाधव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.

You cannot copy content of this page