राष्ट्रवादीचे एस. टी.विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना निवेदन
⚡कणकवली ता.२२-: तरंदळे फाटा येथे जलद एसटीला थांबा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एस. टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना निवेदन द्वारे करण्यात आले.
गेले अनेक दिवस जलद एसटी तरंदळे फाट्यावर थांबवण्यात येत नव्हती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विभाग नियंत्रकांचे लक्ष वेधण्यात आले. या संदर्भात विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव. जिल्हा कृषी सेल अध्यक्ष समीर आचरेकर. कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर,सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष अजय जाधव आदी उपस्थित होते.
