आजगाव साहित्य कट्ट्याची २४ रोजी मासिक सभा

⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची एकविसावी मासिक सभा रविवार २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता आजगाव वाचनालयात आयोजित केली आहे.

या सभेचा विषय ‘कथाकथन’ असून विनायक उमर्ये, देवयानी आजगावकर आणि सोमा गावडे हे कथाकथन करतील. सदर तीनही साहित्यप्रेमी हे साहित्य कट्ट्याचे सदस्य असून ते स्वतंत्र कथा सादर करणार आहेत. त्यांचे कथाकथन ऐकण्यासाठी व त्यावर चर्चा करणेसाठी या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page