विविध समस्यांवर काढण्यात आला मार्ग
⚡ओरोस ता.२१-: प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण सहसंचालक पुणे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखा व सिंधुदुर्ग शिक्षक समिती शिष्टमंडळाची यशस्वी चर्चा झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे व राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांचे नेतृत्वाखाली शिक्षण सहसंचालक देविदास कुलाळ यांच्याशी शालेय पोषण आहार व अन्य विविध प्रलंबित प्रश्नावर विस्तृत चर्चा करण्यात आली
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाशाखा प्रभारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, जिल्हा शिक्षकनेते नंदकुमार राणे आदी पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उपस्थित होते.
यावेळी शालेय पोषण आहार बाबत 2015 पासून 2021 पर्यंत शाळांकडे मागविण्यात आलेली 22 पानी माहिती, विविध झेराॅक्स याबाबत शिक्षण सहसंचालक देविदास कुलाळ यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी सदर योजना पुढील काळात केंद्रशासनाकडुन राबविली जाणार असल्याने राज्य शासनाकडुन या योजनेची सबंधित कालावधीतील रेकाॅर्ड तपासणी माहिती आढावा पूर्ण झालेनंतर स्थानिक आॅडिट हे बंद होणार आहे. त्यामुळे ही माहिती शाळांना देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. परंतू जी माहिती उपलब्ध होत नसेल तिथे उपलब्ध नाही असा शेरा मारून माहिती द्यावी तसेच याबाबत कक्ष अधिकारी अंकुश शहागंटवार यांच्याशी चर्चा करावी. तसेच शिक्षण संचालक दिनकर पाटील यांचेशी चर्चा करून सुधारित आदेश काढला जाईल असे आश्वासन दिले.
