*💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दोडामार्ग अंतर्गत क्षयरोग,कुष्ठरोग अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक राजेश वाघाटे,शैलेश लोंढे,यु.के.गवस,सौ.बांबुळकर,मुख्या.महेंद्र देसाई व शिक्षक उपस्थित होते. यावेळी क्षयरोग होतो कसा, त्याची लक्षणे, कारणे व त्यापासून घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन वजा विद्मार्थांशी चर्चा राजेश वाघाटे यांनी केली.तसेच कुष्ठरोग व तो कसा टाळता येईल, त्याचा संर्सग कसा कमी करता येईल या संदर्भात विद्मार्थांना मार्गदर्शन शैलेश लोंढे यांनी केले.प्रास्ताविक श्री.देसाई यांनी केले.आभार श्री.धर्णे यांनी मानले.
*कळणे विद्मालयात क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळा
