शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा आरोप…
⚡सावंतवाडी ता.१६-: गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महावितरणचे काम संथ गतीने सुरू असल्याने, त्याचा नाहक त्रास ग्रामीण भागातील जनतेला भोगावा लागत असून, ग्रामीण भागात 15-15 दिवस लाईट गायब असते. परंतु, स्थानिक आमदार केवळ पाहुण्यासारखे येऊन जात आहेत. त्यांना मतदारांचा विसर पडला आहे. सत्तेची हवा आणि मंत्रिपदाच्या हव्यासापोटी ते मतदारसंघाला विसरले आहेत. असा आरोप शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी येत्या चार दिवसात हा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी राऊळ बोलताना म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आमदार दिपक केसरकर यांनी केले आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत हे लोकांना दिसले. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेची काळजी करू नये, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशी भूमिका तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे मांडली
यावेळी शब्बीर मणियार,गुणाजी गावडे,प्रशांत कोठावळे,चंद्रकांत कासार,अपर्णा कोठावळे,आदी उपस्थित होते.
