*💫सावंतवाडी दि.२१-:* मुक्ताई बुद्धीबळ व कॅरम अॅकेडमी, सावंतवाडी आणि श्री चेस अॅकेडमी, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिली सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालय हॉल येथे रविवार ३१जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. कोविड कालावधीतील सर्व नियमांचे पालन करुन स्पर्धा खेळविण्यात येईल. स्पर्धेचे उदघाटन युवराज श्रीमंत लखमराजे भोसले व युवराज्ञी श्रीमंत श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते आणि प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सूर्यकांत पेडणेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे. स्पर्धेत खुल्या गटात प्रथम १५०० रूपये व चषक, द्वितीय १००० रूपये व चषक, तृतीय ७०० रूपये व मेडल, चौथा ५०० रूपये व मेडल, पाचवा ३०० रूपये व मेडल आणि २० वर्षाखालील विद्यार्थी गटात प्रथम २०० व मेडल, द्वितीय १०० रूपये व मेडल, तृतीय मेडल आणि १३ वर्षाखालील विद्यार्थी गटात प्रथम २०० रूपये व व मेडल, द्वितीय १०० रूपये व मेडल, तृतीय मेडल आणि २० वर्षाखालील विद्यार्थिनी गटात प्रथम २०० रूपये व मेडल, द्वितीय १०० रूपये व मेडल, तृतीय मेडल अशी चार गटांमध्ये एकूण चौदा पारितोषिके व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धा भारतीय बुद्धीबळ संघटनेच्या नियमांनुसार एकत्र स्विस लीग राउंड्स पदधतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या संख्येवर राउंड्स आणि वेळ ठरविण्यात येईल. नाव नोंदणीची अंतीम तारीख शनिवार ३० जानेवारी आहे. अधिक माहीतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन मुक्ताई अॅकेडमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर आणि श्री चेस अॅकेडमीचे संचालक श्रीकृष्ण आडेलकर यांनी केले आहे.
सावंतवाडीत ३१ रोजी जिल्हास्तरीय खुली बुद्धीबळ स्पर्धा…
