सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे इशारा
*💫सावंतवाडी दि.२१-:* कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील महाविद्यालयीन शिक्षक काटकर सर यांनी एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पाल्याच्या सांगण्यावरून मारहाण केली. काटकर सरांवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात वेळ पडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील महाविद्यालयीन शिक्षक काटकर सर यांनी एका विद्यार्थ्याने केलेल्या गैरवर्तवणुकी संबंधी विचारणा केली असता संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांने कॉलेजमध्ये बेकायदा प्रवेश करून आपल्या पाल्यासोबत घडलेल्या घटनेची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता किंवा प्राचायार्शी न बोलता केवळ आपल्या पाल्याच्या सांगण्यावरून काटकर सरांना मारहाण केली. ही घटना निंदनीय असून संबंधित पाल्याच्या पालकांवर कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काटकर सरांच्या पाठीशी त्यांची संस्था खंबीरपणे उभी राहिली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना काटकर सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून झालेल्या घटनेचा संघटनेतर्फे जाहीररीत्या निषेध करण्यात आला. शाळेत शिक्षकांना फक्त दिलेला विषय शिकवण्याच्या जबाबदारी बरोबर शाळेत शिस्त राखणे, शाळेत विद्यार्थ्यांमध्ये गैरवर्तवणूक निदर्शनात आल्यास यास निर्बंध घालणे अशा बºयाचशा जबाबदाºया शिक्षकांकडे असतात. याचा संबंधित विद्यार्थ्याच्या व त्यांच्या पालकांना विसर पडलेला दिसतो. स्वत: च्या पाल्याच्या सांगण्यावरून काटकर सरांनी केलेली मारहाण निंदनीय व लांच्छनास्पद आहे. काटकर सरांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात वेळ पडल्यास आंदोलन करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेच्यावतीने सरांना देण्यात आले.
