असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचा इशारा*
*💫कणकवली दि.२१-:* देवगड निपाणी महामार्गावर असलदे येथे खड्डेमय रस्ता झाला आहे.तो रस्ता दुरुस्ती करण्यासाठी अनेकदा आश्वासन देऊनही अधिकारी फसवणूक करत आहेत.आता गावठणवाडी येथे रस्त्यावर खडी फसरवून ठेकेदार पशार झाला आहे.त्यामुळे सदर रस्ता ४८ तासात सुरळीत न केल्यास पिडब्ल्यूडीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे. नांदगाव देवगड मार्गावरील असलदे ते कोळोशी दरम्यानचे अवघ्या दोन किलोमीटरचे रस्त्याचे नुतनीकरण काम दोन महिने झाले तरी संपेना.बोगस कामाचा कळस गाढलेले हे काम सध्या जोरदार चर्चेत आहे.डांबराचा अमृता सारखा शिडकावा करुन सुरू असलेले बी.बी.एम. एम.पुढे काम सुरू असतानाच मागून रस्त्याला पडत जाणारे खड्डे, अपघातास निमंत्रण देणारी रस्त्यावर टाकलेली खडी यामुळे नागरिक व वाहन चालक पुरते त्रासलेले आहेत.आता अजून किती दिवस हे काम चालणार हा प्रश्न आहे. असलदे डामरेवाडी ते आयनल फाटा येथील रस्त्याचे नुतनीकरण काम गेल्या वर्षी पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे रखडले होते.पावसाळा संपल्यावर काम सुरु होता होईना. त्यानंतर असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली.सुरवातीला मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले.मात्र हे काम सुरू असतानाच कामगार पळून गेले.आणि तोपर्यंत लहान खड्यांनी बाळसं घेतलं.सुमारे पंधरा दिवसांनी दुसरी कामगारांची फळी आली पुन्हा एकदा बीबीएमचे पॅचवर्क सुरु झाले.मात्र सातत्याने काम बंद ठेवत ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पंढरी वायगणकर यांनी दिला आहे. देवगड निपाणी महामार्गावर असलदे येथे सदर रस्ता ४८ तासात सुरळीत न केल्यास पिडब्ल्यूडीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे . सदर काम अर्धवट सोडून गेल्याने रस्त्यावर खडी हातरलेली जैसे थे आहे यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे व वाहनांतून अपघात होत आहे.१० ते १२ दुचाकी वाहन अपघात झाले आहेत. ३१ जानेवारी रोजी असलदे पिर बाबांचा उरूस होत आहे,त्यामुळे तातडीने काम करावे अशी मागणी पंढरी वायगंणकर यांनी केली आहे.
