*अंगणवाडी सेविकांचे काम वाखण्याजोगे आदर्शवत

*जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांचे प्रतिपादन

*💫सिंधुदूगनगरी दि.२०-:* मुलांची काळजी घेऊन विद्याथयांना घडविताना समाजासाठी केलेल्या सामाजीक कार्यातून केलेले काम वाखाणण्या जोगे आदर्शवत आहे. याचा आदर्श अन्य अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मुख्य सेविका यांनी घ्यावा असे आव्हानात्मक प्रतिपादन जिप अध्यक्षा समिधा नाईक केले.

सिंधुदुर्गनगरी येथील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात जि .प.महिला बाल विकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी सेविका मुख्य सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन जि .प अध्यक्षा समिधा नाईक यांच्या हस्ते दिप पजवलनाने व साविञी बाई फुले याच्या फोटो ला पुष्प हार घालुन पार पडले, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर ,शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके ,समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर ,जि .प सदस्या श्वेता कोरगावकर ,संपदा देसाई, पल्लवी राऊ ळ, पल्लवी झीमाळ ,प .सदस्या सुप्रिया वालावलकर ,ओरोस सरपंच प्रीती देसाई ,महिला बाल विकास अधिकारी अमोल पाटील आदींसह पुरस्कार प्राप्त मुख्य सेविका, सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,तालुका प्रकल्प अधिकारी , महिला बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाल विकास विभागाच्या संध्या मोरे, विद्या गुरखे यांनी केले . तर प्रास्ताविक महिला बालविकास अधिकारी अमोल पाटील यांनी केले . महिला बाल विकास विभागामार्फत दरवर्षी देण्यात येणाऱ्या अंगणवाडी सेविका ,मुख्य सेविका,मदतनीस ,मिनी अंगणवाडी सेविका यांना पुरस्कार दिले जात आहेत कोरोणा काळातही अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका यांनी उत्तम काम केले असल्याचेही त्यानी नमूद केले यावेळी एकूण 49 अंगणवाडी सेविका, तीन मुख्य सेविका 49मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ ,प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. जिप अध्यक्षा समिधा नाईक म्हणाल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे कार्य मोलाचे आहे लहान वयात विद्यार्थीदशेत तीन वर्षानंतर बालक घडविण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात त्यांना पोषण आहार आरोग्याची काळजी यासह मुलांची काळजी घेण्याचे काम वाखाणण्याजोगे आहे तीन वर्षानंतर मुल विद्यार्थिदशेत घडविण्याचे काम करताना समाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या काम करताना जनतेच्या हिताच्या दृष्टीने विविध योजना समाजापर्यंत पोहोचून केलेल्या कार्याचा हा गौरवच आहे .जिल्ह्यातील 109 अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका यांचा आज गौरव केला जात आहे अशा अनेक आदर्शवत अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडीसेविकांचा आदर्श अन्य अंगणवाडी सेविकांनी घेऊन पुढील वर्षी आपला या पुरस्कारासाठी गौरव होईल असे आदर्शवत कार्य करा असे आवाहन नाईक यांनी केले. यावेळी मुख्य सेविका सौ क्षमा प्रभुदेसाई यांनी आपले विचार व्यक्त करत अंगणवाडी सेविका मुख्य सेविका आणि मदतनीस आणि केलेल्या कामाची ही पोचपावती आहे यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच आम्ही आज पुरस्कार प्राप्त होऊ शकलो असेही सांगितले. यावेळी महिला बाल विकास विभागातील सातत्याने कार्यतत्पर विस्तार अधिकारी म्हणून काम करणारे आणि गौरवास पात्र असे पी. आर सावंत यांचा जि प अध्यक्षा समिधा नाईक यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्याचे असेच आपले कार्य आणि सेवा तत्परतेने बजावावी असे सूचित करण्यात आले .शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page