श्री गांगेश्वर सेवा मंडळ मुबई नडगिवेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील नडगिवे गावठणवाडी येथील मुंबई स्थित श्री गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई या मंडळाच्यावतीने नडगिवे गावातील तसेच पंचक्रोशीतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी कै.सुभाष मण्यार विद्यार्थी दत्तक पालक योजनेअंतर्गत सुमारे ३४ विद्यर्थ्यांचे पालकत्व स्वीकारून अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.


शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुहास पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली जि प शाळा नडगिवे नं.१ येथे सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक श्री संजय सानप सर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,नडगिवे सरपंच अमित मांजरेकर उपसरपंच अरविंद कर्ले,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल,खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई,भाऊ राणे,खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर,नडगिवे शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीम अनिता पाटकर गांगेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ मण्यार,कार्याध्यक्ष संदीप कर्ले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळाच्या वतीने नडगिवे जि प शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर मंडळाचे माजी सचिव कै.सुभाष मण्यार यांच्या समरणार्थ दत्तक पालक योजनेअंतर्गत पंचक्रोशीतील इयत्ता ५ वी ते १२ वी तसेच महाविद्यालयीन गरजू व होतकरू सुमारे २४ विदयार्थ्यांना दप्तर ,पेन,कंपास,चप्पल,छत्री,वह्या ,
पुस्तके,शालेय गणवेश आदी शैक्षणिक वस्तूंचा संच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आला. तर नडगिवे जि प शाळा नं.१ ला शालेय वजन काटा आशिष मण्यार व संदीप मण्यार यांच्या शुभहस्ते मंडळाच्या वतीने शिक्षकाकडे देण्यात आला.
तसेच नडगिवे जि प शाळा नं.१ च्या निवृत्त माजी मुख्यध्यापिका श्रीम सावंत व खारेपाटण हायस्कुलचे शिक्षक व नडगिवे गावचे सुपुत्र राजेश वारंगे यांचा गौरवास्पद कामगिरी बद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आल
“विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे आणि आपल्या शाळेबरोबर आपल्या गावाचे व समाजाचे आणि कुटुंबाचे नाव उज्जवल केले पाहिजे.”असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी कार्यक्रम प्रसंगी केले.” तर विजय देसाई,राजेश वारंगे,सावंत मॅडम, रमाकांत राऊत,सद्गुरू कुबल,संदीप सुर्वे यांनी देखील आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी गांगेश्वर सेवा मंडळाचे कार्यकर्ते गुरुनाथ मण्यार,गणेश मण्यार,गणेश पाटील,सचिन मण्यार, गजानन सावंत,आत्माराम मन्यार, महेश मण्यार,दीपक मण्यार आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सेक्रेटरी प्रकाश राणे यांनी केले.तर संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मंडळाचे कार्यकर्ते भास्कर राणे यांनी केले.

You cannot copy content of this page