माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा गौयफोट
*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी शहरात सत्तांतर झाल्या नंतर जी परसिस्थी निर्माण झाली आहे ते पाहून खूप वाईट वाटत असे विधान माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. शहरात भर बाजारपेठेत एक गाळा ३ हजार रुपये भाडे ठरवून नगरपालिकेने एका परप्रांतीय व्यक्तीला देण्याचा ठराव मंजूर केला आहे. या व्यवहारात २७ लाख पेक्षा जास्त रूपयाचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. हे पैसे कोणाच्या खिशात गेले याचा नगराध्यक्षांनी खुलासा करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. तसेच जुना बस स्टॉप कडील देखील एक गाळा फक्त १५१९ रुपयाच्या भाडे तत्वावर २५ हजार रुपये प्रीमियम भरून एका परप्रांतीय व्यक्तीला देण्यात आला आहे.
