⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ चा १०० टक्के निकाल लागला आहे.
यात पार्थ प्रशांत राऊळ (९७.८०) गुण मिळवून प्रथम, सेजल बापू शिरोडकर (९१.००) गुण मिळवून द्वितीय तर प्रणव प्रविण गोसावी हीने (९०.६०) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. परीक्षेसाठी एकूण प्रशालेतून ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व. विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्रद्धा सावंत यांनी अभिनंदन केले आहे
