गणपतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
सावंतवाड ,ता.१७-: शहरातील वैश्यवाडा परिसरात आणखी एक घरफोडीचा प्रकार आज उघडकीस आला आहे.यात संबंधित चोरट्यांनी चार कपाटे फोडून गणपतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केला . घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. हा प्रकार काल झाला असावा, असा संशय आहे. शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी माहिती दिल्यानंतर घरमालकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
