कणकवली नगर पंचायत बहुउद्देशीय
हॉल येथे 23 जून रोजी रक्तदान शिबिर

⚡कणकवली ता.१७-: भारतीय जनता पार्टी कणकवली शहर आयोजित आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवस निमित्ताने गुरूवार २३ जुन २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान शिबिर कणकवली नगर पंचायत बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित करण्यात येत आहे .

तरी कणकवली शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते यांनी याची नोंद घ्यावी. तसेच भाजपा कणकवली शहरवासीयांना आवाहन करत आहोत की, विविध सामाजिक संस्था व्यक्ती यापैकी ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी आपली नोंदणी भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली अजय घाडीगावकर मोबाईल नंबर- ९४०४९२४३५४ यांच्याकडे करावी . सध्याच्या वातावरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे व शहराध्यक्ष सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे यांनी केले आहे

You cannot copy content of this page