राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त
उपजिल्हा रुग्णालयाला साहित्य वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे सौजन्य

⚡कणकवली ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या सौजन्याने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला चादर, मास्क सॅनिटायजर आदि आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. शिकलगार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले.


यावेळी बोलताना प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार हे सर्वसामान्य जनतेला प्राधान्य देणारे नेतृत्व आहे. खा. शरद पवार यांच्या धोरणानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सेवाभावी सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून गोरगरीब रुग्णांना उपयोगी येणारे साहित्य आज उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले की, जनतेला अपेक्षित असणारा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. आदरणीय शरद पवार यांच्या ध्येयधोरणाला अनुसरूनच आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करत आहोत. जनतेच्या कामातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सिंधुदुर्गात सुरू राहील.यावेळी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर, प्रदेश सदस्य निलेश गोवेकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, विनोद मर्गज, निखिल गोवेकर, रुजाय फर्नांडिस, समीर आचरेकर, राजेश पाताडे, देवेंद्र पिळणकर,सागर वारंग, संदेश मयेकर, शंकर चिंदरकर, सखाराम हुंबे, सेनापती सावंत, राजू मेस्त्री, सुजल शेलार, उत्तम तेली, सर्वेश पावसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page