मोती तलावाकाठी खचलेले फूटपाथ दुरुस्त करा

⚡सावंतवाडी ता.१४-: येथील मोती तलावाच्या काठावर असलेला फूटपाथ हा ठिक ठिकाणी खचला असून पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनला आहे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून धोकादायक पुथपाथ तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा या खड्ड्यात आम्ही वृक्षारोपण करू असा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून यात असे म्हटले आहे की मोती तलावाच्या काठावर असलेले फूटपाथ धोकादायक बनला आहे पुथपाथ अनेक ठीकाणी खचला असून खोल खड्डे पडले आहेत यामुळे पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तर त्या खड्यात जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत तसेच गाळ काढताना तीन मुशी परिसरातील फुटपाथ खचून उंच सखल बनला आहे तो देखील दुरुस्ती होणे गरजेचे आहे त्यामुळे याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ भूमिका घेत फूटपाथचे काम तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील

You cannot copy content of this page