नांदगाव- असलदे पुलादरम्यान अपघातात एक गंभीर

⚡कणकवली ता.१२-: मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव असलदे तावडेवाडी पुलादरम्यान पहाटे ५.३० च्या दरम्यान उभ्या असलेल्या कंटेनरला ४०७ टेंम्पोने मागाहून जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून एक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव असलदे तावडेवाडी पुलादरम्यान आज पहाटे ५.३० च्या दरम्यान कंटेनरला थांबलेला होता. या थांबलेल्या कंटेनरला पुणे हुन गोव्याच्या दिशेने जाणारा ४०७ / एम.एच.०७ एक. जे. ,२४९२ या टेंम्पोने मागाहून जोरदार धडक दिली.या धडकेत टेंम्पो चे मालक असलेले हर्षद कामत हे जवळपास दिड तास टेम्पोंतच अडकून पडले. त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

दिड तासानंतर कर्नाटक निपाणी येथील १२ टायर गाडी चालक मोसीम शेख हा देवदुतासारखा धावून आला . आणि आपल्या ताब्यातील गाडीला मोठी दोर बांधून दोन ते चार वेळा प्रयत्न करुन अडकलेल्या इसमाला बाहेर काढले.

यावेळी स्थानिक मदतीला धावून आले होते .यात असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,गवस साठविलकर, हुसेन नावलेकर, तसेच रात्री गस्त घालत असलेले पोलिस रविंद्र बाईत ,किरण कदम यांनी सहकार्य केले.

गंभीर दुखापती झालेल्या हर्षद कामत यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ड्रायव्हरने तळेरे येथून गाडी मालकाच्या ताब्यात दिली होती. आणि ड्रायव्हर राजू केरकर हे साईडला बसले होते त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

You cannot copy content of this page