“या” एसटी फेऱ्या सुरू करण्याची मळेवाड- कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांची मागणी

सावंतवाडी — सातार्डा शिरोडा,सावंतवाडी शिरोडा व किनळे सावंतवाडी ह्या एस टी बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे.
सोमवारपासून शाळा कॉलेज सुरू होत आहेत.कोरोना कालावधीत व त्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे काही बसणाऱ्या एसटी प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या होत्या.त्यातील काही बस फेऱ्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत.आता पुढील दोन चार दिवसात शाळा व विद्यालये सुरू होत आहेत.यामुळे शिरोडा व सावंतवाडी येथील शाळा विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी सातार्डा मळेवाड मार्गे शिरोडा बसफेरी सुरू करण्याची मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी वेंगुर्ला आगाराचे स्थानक प्रमुख यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.तर किनळे सावंतवाडी व सावंतवाडी शिरोडा ह्या सकाळ च्या बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी सावंतवाडी आगार प्रमुख यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

You cannot copy content of this page