पाडलोसमध्ये पर्यावरणपुरक कापडी बॅग बनविण्याचे प्रशिक्षण

⚡बांदा ता.१२-: ग्रामसचिवालय पाडलोस व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वा वित्त आयोग अंतर्गत आयोजित केलेल्या पर्यावरणपुरक कापडी बॅग प्रशिक्षण कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


प्रशिक्षणात ४० महिलांनी सहभाग घेतला होता. टाकाऊपासून टिकावू या संकल्पनेतून कापडी कपड्यांपासून विविध प्रकारच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्याना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी पाडलोसचे सरपंच अक्षरा पाडलोसकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, ग्रामपंचायत सदस्य बंधू व भागिनी, रोणापालचे सरपंच सुरेश गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत माधव, सामाजिक कार्यकर्ते मधुकर परब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, प्रकल्प अधिकारी संजय देसाई, प्रशिक्षक प्रकाश पाटील तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संस्था अध्यक्ष विजययिंह भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी केले तर आभार सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी मानले.

You cannot copy content of this page