कणकवली,वैभववाडी तालुक्यात ३५० कोटीचे ४ लघु पाटबंधारे प्रकल्प होणार:सतीश सावंत

महाविकास आघाडीने दिले झुकते माप;१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

⚡कणकवली ता.१०-: कणकवली,वैभववाडी तालुक्यातील ४ लघु पाटबंधारे प्रकल्पाना मंजुरी दिली आहे.कणकवली तालुक्यातील गांधीनगर व सावडाव २ तसेच वैभववाडी तालुक्यातील दिंडवणे व नावळे लघू पाटबंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता देत शासनाने ३५० कोटी रुपयांचा निधी या ४ धरणांसाठी मंजूर केला आहे.या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे.महाविकास आघाडीने दिले झुकते माप दिले असल्याने १ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष,शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिली.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते सतीश सावंत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संभाजी रावराणे,युवा सेना उपतालुका प्रमुख उत्तम लोके आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, पालकमंत्री उदय सामंत, खास. विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने ही मान्यता मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या कणकवली तालुक्यातील गांधीनगर व सावडाव २ तसेच वैभववाडी तालुक्यातील दिंडवणे व नावळे लघू पाटबंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे,त्यासाठी गेली अडीज वर्षे आम्ही पाठपुरावा केला असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.

गांधीनगर लघु पाटबंधारे योजना या योजनेची प्रशासकीय मान्यता किंमत रु . ९ ३ कोटी ८२ लाख ७७,६ ९ ० आहे . पाणीसाठा सहस्त्र घनमीटर ४५०० होणार आहे . सिंचन क्षेत्र हेक्टर २४८ आहे . भूसंपादन क्षेत्र ३७.६२ हेक्टर आहे . धरण लांबी ५७५.०० मीटर आहे . धरण उंची ३५.५० मीटर आहे . पावसाचे पाणी सांडवा लाबी ४०.०० मीटर आहे . यामध्ये धरण , विमोचक सांडवा , पोहोच रस्ता व कालवे असणार आहे . तसेच सावडाव २ लघू पाटबंधारे योजना या योजनेची प्रशासकीय मान्यता किंमत रु . ८६ कोटी ०८ लाख ६ ९ हजार ७७८ आहे . पाणीसाठा सहस्त्र घनमीटर ३७४४.४० होणार आहे . सिंचन क्षेत्र हेक्टर २४८ आहे . भूसंपादन क्षेत्र ३७.७० हेक्टर आहे . धरण लांबी ४५०.०० मीटर आहे . धरण उंची २३.८० मीटर आहे . पावसाचे पाणी सांडवा लाबी ६६.०० मीटर आहे . यामध्ये धरण , विमोचक सांडवा , पोहोच रस्ता व कालवे असणार आहे ही धरणे कणकवली तालुक्यातील आहेत.

तर वैभववाडी तालुक्यातील दिंडवणे लघू पाटबंधारे योजना – या योजनेची प्रशासकीय मान्यता किंमत रू . १०० कोटी ९ ५ लाख ७४ हजार ६८४ आहे . पाणीसाठा सहस्त्र घनमीटर ४५०० होणार आहे . सिंचन क्षेत्र हेक्टर २४८ आहे . भूसंपादन क्षेत्र ३५.०३ हेक्टर आहे . धरण लांबी ४५० मीटर आहे . धरण उंची ४१.९ ६ मीटर आहे . पावसाचे पाणी सांडवा लाबी ४५ मीटर आहे . यामध्ये धरण , विमोचक सांडवा , पोहोच रस्ता व कालवे असणार आहे . तसेच नावळे लघू पाटबंधारे योजना – या योजनेची प्रशासकीय मान्यता किंमत ४७ कोटी ७५ लाख ५८हजार ७१८ आहे . पाणीसाठा सहस्त्र घनमीटर १ ९ २५.०० होणार आहे . सिंचन क्षेत्र हेक्टर १६५.०० आहे . भूसंपादन क्षेत्र २८.९ ७ हेक्टर आहे . धरण लांबी ३००.०० मीटर आहे . धरण उंची ३६.२० मीटर आहे . पावसाचे पाणी सांडवा लाबी २०.०० मीटर आहे . यामध्ये धरण , विमोचक सांडवा , पोहोच रस्ता व कालवे असणार आहे . सदर योजनेच्या कामावरील खर्च हा महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून केला जाईल ,ही कामे येत्या तीन वर्षात पूर्ण होतील असा विश्वास सतिश सावंत यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page