संपर्क प्रमुखपदी प्रसन्ना देसाई
१२ रोजी मंत्री नारायण राणे, श्रीपाद नाईक यांच्याहस्ते शुभारंभ
⚡सावंतवाडी ता.१०-: भाजप पक्षाकडून सिंधुदुर्गात येत्या १२ व १३ जुन रोजी लोकसभा प्रवास योजनेचे आयोजन करतात आले असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवास आयोजित करण्यात आला असून, या लोकसभा प्रवास योजनेचे प्रवास प्रमुख म्हणून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संपर्क प्रमुख प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


यावेळी मनोज नाईक, आनंद नेवगी,राजू बेग दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते.