भोसले इन्स्टिट्यूटच्या २२ विद्यार्थ्यांची फिनोलेक्समध्ये निवड…

⚡सावंतवाडी ता.१६-: फिनोलेक्स केबल्स, गोवा यांच्या वतीने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये इतर कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते.

इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी कंपनीच्या तीन एचआर प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती व नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्रावेळी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिलिंद देसाई व टीपीओ महेश पाटील उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page