⚡कणकवली ता.१६-: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ( ट्रस्ट ) कलमठ कुंभारवाडी रोड, कणकवली येथील आयोजित “श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा” हा भव्य कार्यक्रम २० मार्च २०२६ रोजी होणार आहे. यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
यादरम्यान सकाळी नऊ वाजता अभिषेक गुरुपूजन सकाळी ११:३० वाजता सामुदायिक नामस्मरण व आरती दुपारी १२:३० ते ०३:०० वाजेपर्यंत महाप्रसाद रात्री ७:३० ते ११ वा. महाप्रसाद रात्री ८.०० ते १०.
०० वाजता पालखी परिक्रमा, नृत्य भजन श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ चिंदर -भटवाडी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भाविकांनी पालखी मिरवणूक व जयंती उत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
