⚡मालवण ता.०८-: बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावण्याची परंपरा कायम राखणाऱ्या मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीचा ही बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयातून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली. या जुनीअर कॉलेजमधून वाणिज्य विभागाची प्रेरणा पांडुरंग पाताडे
५०४ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण )मुंबई संचालित
भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयामधून २०२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले या महाविद्यालयाचा वाणिज्य शाखा सलग अकरा वर्षे १०० टक्के निकाल, कला शाखेचा सतत दहा वर्ष १०० टक्के निकाल आणि विज्ञान शाखेचा सतत सहा वर्षे १०० टक्के निकाल लागला.
यावर्षी या कनिष्ट महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून प्रथम- प्रथमेश महेश आर्लेकर (गुण ३७८ ), द्वितीय- मुस्कान दाऊदमिया शेख (गुण ३६० ) व यश पदमाकर पिळणकर (गुण ३६० ), तृतीय- निकिता बाबाजी मेस्त्री (गुण ३५२ ), कला विभागातून प्रथम- पियुष संतोष चव्हाण (गुण ४५८ ), द्वितीय- चिन्मय पुंडलिक ढोके (गुण ४२८ ), तृतीय- ओम जयकुमार शिंदे (गुण ४२५ ), वाणिज्य विभागातून प्रथम- प्रेरणा पांडुरंग पाताडे (गुण ५०४ ), द्वितीय- भक्ती राजाराम तेंडुलकर (गुण ४८१), तृतीय -पूजा दिपक पाडावे (गुण ४८० ) यांनी यश मिळविले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य वामनराव खोत, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी तसेच इतर संस्था पदाधिकारी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.