कोंडुरे तिठा येथील खड्डा देतोय अपघातास आमंत्रण…

खड्ड्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तो अधिकच रुंदावतोय..

⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील कोंडुरे तिठा येथील रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा सध्या अपघातास कारणीभूत ठरत असून,याबाबत स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून सुद्धा अजून पर्यंत हा धोकादायक खड्डा बुजविला नसल्याने तो अधिकच रुंदावत असून खोल पर्यंत पडला आहे.
कोंडुरे तिठा येथे रस्त्याच्या मधोमधच असलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.तसेच या पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होऊन गाड्यांचे नुकसान झाले आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडली की,संबंधित विभागाला जाग येणार काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ वाहनचालक करत आहेत.
त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हा पडलेला खड्डा बुजवून पुढील अनर्थ टाळावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page