शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची चर्चा
कणकवली 8 जून (प्रतिनिधी)-.वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत ऑनलाइन आयोजित केलेले आहे .या प्रशिक्षणामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत.वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण इंन्फोसीस कंपनीकडे देण्यापेक्षा जिल्ह्यातील अध्यापक महाविद्यालयांना देण्यात यावे . तरच ते अधिक दर्जेदार होईल . असे कास्ट्राईब संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले .
वरील सर्व बाबींचा विचार करून प्रशिक्षण पूर्वीप्रमाणे ऑफलाईन घेण्यात यावे . यावर शालेय शिक्षण मंत्री महोदया प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी याबाबत योग्य विचार करून निश्चित या बाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले .कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे, सिंधुदुर्ग कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, संदेश कदम यांनी निवेदन देऊन चर्चा केली.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत.यातील अभ्यासक्रम जास्त प्रमाणात आहे. रोज तीन ते चार तास बसून अभ्यास करावा लागत आहे .ग्रामीण आणि डोंगराळ भागातील नेटवर्क नाही .त्यांचं वय 50 वर्ष पेक्षा जास्त आहे त्यांना सातत्याने मोबाईल किंवा लॅपटॉपवर बसता येत नाही. काही शिक्षक नेत्र विकाराच्या आजाराने त्रस्त आहेत. प्रत्येक मॉड्युलर संपल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये स्वाध्याय लेखन करावयाचे आहे. त्यांची परीक्षा आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. आमच्या संघटनेच्या वतीने मंत्री महोदयांना विनंती करण्यात येत आहे की सदर प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम कमी करावा व उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे निकष शिथिल करावे .काम कमी करावे तसेच प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा. ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे ही बाब शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निदर्शनास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे, सिंधुदुर्ग कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, संदेश कदम यांनी निवेदन देऊन आणली.