कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल १०० टक्के

परिणीती टिपणीस हिने पटकाविला प्रथम क्रमांक

⚡सावंतवाडी ता.०८-: कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून कला विभागात परिनीता राहुल टिपणीस हिने ७५.१७ टक्कांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक श्रेया संतोष भानसे ६७.०० टक्के तर तृतीय क्रमांक क्रमांक मयुरी रमेश जाधव ६६.३३ टक्के प्राप्त केले आहेत.

तर वाणिज्य विभागात दिपाली सुरेश म्हालटकर ६२.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक आंकाक्षा आनंद मळेकर ६२.१७ टक्के तर तृतीय क्रमांक आसावरी विठ्ठल गवंडे ६१.६७ टक्के प्राप्त केले आहेत.

You cannot copy content of this page