मालवण केंद्राचा बारावीचा निकाल ९९.३४ टक्के

सात कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० ℅

मालवण ता.०८-:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात मालवण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९९.३४ टक्के एवढा लागला आहे.

तालुक्यातून या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या ९२१ विद्यार्थ्यांपैकी ९१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली. तर ३९७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ४१३ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर २५ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळवली. तालुक्यातून ७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

You cannot copy content of this page