सायकलपटू नितांत च्या पाठीवर वनविभागाची कौतुकाची थाप

वनपरिक्षेत्र अधिकारी घुणकीकर यांनी केला सत्कार

⚡कणकवली ता.०८-: सायकल रायडिंग करत हिरवे जगू हिरवे जपू हा निसर्गसंवर्धन चा संदेश देणाऱ्या वरवडे – कणकवली येथील सायकलपटू नितांत राजन चव्हाण च्या पाठीवर वनविभागाने कौतुकाची थाप दिली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी नितांतचा सत्कार केला.

कणकवली येथील कनक रायडर्स चा सदस्य असलेल्या 16 वर्षीय नितांत चव्हाण याने 1 मे ते 14 मे दरम्यान कणकवलीहून चिपळूण मार्गे मुंबई आणि मुंबईहून पुणे कोल्हापूर मार्गे कणकवली असा 1 हजार 100 किमी चा प्रवास सोलो सायकल रायडिंग ने पूर्ण केला होता. या सायकल प्रवासादरम्यान नितांत ने हिरवे जगू..हिरवे जपू हा निसर्ग संवर्धन करण्यासाठीचा संदेश समाजात दिला होता.नितांत च्या पर्यावरण संवर्धक उपक्रमाची वनविभागाकडूनही दखल घेण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नितांत चा वनविभागाच्या वतीने कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी नितांत याने आपल्या सायकल रायडिंग प्रवासातील अनुभव वनक्षेत्रपाल घुणकीकर व उपस्थितांना कथन करताना पनवेल ते कन्याकुमारी या 66 क्रमांक हायवे चौपदरीकरण करताना करण्यात आलेल्या बेसुमार वृक्षतोडीचा मुद्दा ठळकपणे मांडला.वनक्षेत्रपाल घुणकीकर यांनी नितांत ने केलेल्या धाडसी सायकल सवारी चे कौतुक करत पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लेखापाल जयमाला राठोड , लिपिक संतोष आंबेरकर , भास्कर शिर्के, अपेक्षा सुतार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page