सामाजिक बांधिलकीकडून आपत्कालीन व्यवस्थापन टीमची स्थापना…

बबन साळगावकर; सामाजिक बांधिलकी ग्रुपच्या अध्यक्षपदी रवी जाधव यांची नियुक्ती

⚡सावंतवाडी ता.०८-: शहरामध्ये सामाजिक बांधिलकी आपत्कालीन व्यवस्थापन टीम ची आज स्थापना करण्यात आली असून, त्याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच सामाजिक बांधिलकीच्या अध्यक्षपदी आजच रवी जाधव यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा देखील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले.

सामाजिक बांधिलकी या संघटनेने या पूर्वी रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक शैक्षणिक करोना काळात मदत मिळवून देणे मदत करणे रमाई घरकुल योजनेच्या वतीने सुमारे 17 पेक्षा जास्त घरकुले रवी जाधव यांच्या प्रयत्नातून या भागांमध्ये उभी राहिली आहेत तसेच ऋग्नसेवा रुग्णांना शासकीय वैद्यकीय मदत मिळवून देणे तात्काळ रुग्णांना मदत पोचविणे केशवसुत कविसंमेलन या सारखे साहित्य क्षेत्रामध्ये काम करणे अशा अनेक प्रकारची कामे गेल्या दोन वर्षांमध्ये रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत आणि आज त्यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी आपत्कालीन मदत कार्य टीम ची स्थापना होत असून याचं सावंतवाडी शहर कार्यक्षेत्र व जवळचे लगतचे गावामध्ये आपत्कालीन तात्काळ मनुष्यबळ मदत कार्य करण्यात येणार आहे याची घोषणा आज होत आहे.

यासाठी 15 सर्वांची टीम तयार करण्यात आली असून यांच्या मार्फत मदत कार्य सुरू करण्यात येणार आहे यामध्ये शासनाच्या संबंधित खात्यामध्ये संपर्क करणे उदाहरणार्थ तहसीलदार प्रांत कार्यालय पोलीस स्टेशन वीज वितरण कार्यालय यांच्याशी संपर्क करून आपत्कालीन माहिती देणे यासाठी माजी नगरसेवक सुरेश भगटे विलास जाधव उमेश कोरगावकर संजय पेडणेकर माजी नगरसेवकांची नगरसेवकांची टीम शासकीय संपर्क करून मदत कार्यासाठी चालना देतील प्रत्यक्ष काही ठिकाणी स्वतः मार्गदर्शन करतील तसेच या अटींमध्ये उमेश खटावकर प्रदीप नाईक अरुण घाडी हर्षल बेग संतोष तळवणेकर लक्ष्मण कदम नासिर पटेल बंड्या तोरस्कर मी निलेश पाटील बंटी माटेकर दिलीप पवार कृष्णा लाखे दीपक सावंत कल्याण कदम मनोज घाटकर किरण वाडकर शुभम मलकाचे हे या टीम मध्ये काम करणार आहेत याबाबतची बैठक काल संपन्न झालीखालच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन सामाजिक बांधिलकी आपत्कालीन व्यवस्थापन मदत कार्यक्रमाची बांधणी करण्यात आली आहे या यामुळे शहरातील भागातील नागरिकांना दिलासा मिळेल

You cannot copy content of this page