जयसिंग पाटील यांनी ग्रामीण भागातील मुले घडवून घेतलेले व्रत केले पूर्ण…

टी डी एफ शिक्षक संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष तानाजी पाटील यांचे प्रतिपादन…

मालवण दि प्रतिनिधी गेली ३६ वर्षे मालवण शहराबरोबरच वडाचापाट सारख्या ग्रामीण भागातील मुले घडविण्याचे घेतलेले व्रत पूर्ण केल्याचे समाधान जयसिंग पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे तोच खरा पुरस्कार आहे श्री पाटील यांच्या चेहऱ्यावरील समाधान ,आनंद हा पुढील आयुष्यासाठी जगण्याची नवी उर्मी देईल असे प्रतिपादन टी डी एफ शिक्षक संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री तानाजी पाटील यांनी येथे बोलताना केले वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचे माजी क्रीडा शिक्षक श्री. जयसिंग पाटील हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले यावेळी श्री. पाटील यांचा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाच्या वतीने छोटेखानी सत्कार समारंभ वडाचापाट आयोजित करण्यात आला होता. सध्या उन्हाळी सुट्टीमुळे हायस्कूल बंद आहे यामुळे भंडारी एज्युकेशन सोसायटीने श्री. पाटील यांचा सत्कार शाळा सुरू झाल्यानंतर करण्याचे ठरविले आहे त्याची माहिती संस्था प्रशासनाने दिली.

यावेळी टीडीएफ शिक्षक संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, वडाचापाट हायस्कूलचे शिक्षक प्रसाद कुबल, प्रफुल्ल देसाई, महेश गावडे, गुरुदास हडकर, ओंकार यादव हे उपस्थित होते. यावेळी श्री पाटील यांनी आपल्या सेवानिवृत्तीपर वडाचापाट हायस्कूलला पन्नास हजार रुपये किंमतीचे संगणक संच तसेच क्रीडा साहित्य दिले. यावेळी बोलताना श्री तानाजी पाटील यांनी जे. एन. पाटील सर जसे क्रीडा शिक्षक आहेत तसेच ते उत्तम विज्ञान हा विषय देखील शिकवतात आणि विज्ञानचा शिक्षक हा संपूर्ण शाळेचा कणा असतो. भंडारी हायस्कूल मध्ये असताना त्यांनी विज्ञानचे धडे देत मुलांना नॅशनल पर्यंत नेले ही साधी सोपी गोष्ट नव्हती आणि विज्ञान सारखा विषय अतिशय क्लिष्ट आणि त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो आणि ते काम पाटील सर यांनी उत्तमरीत्या केल्याचे सांगून भंडारी हायस्कूल मध्ये बरीच वर्षे काम केल्यानंतर पदोन्नती साठी ते वडाचापाट येथे आले. शाळा छोटी असली तरी खेळामध्ये विज्ञानामध्ये नाविन्यपूर्ण भूमिका बजावली तसेच मुख्याध्यापक पदाची जबाबदारी देखील त्यांनी उत्तमरीत्या बजावल्याने ते कौतुकास पात्र ठरतात असे म्हणाले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री अजय शिंदे यांनी १९८३ मध्ये टोपीवाला बोर्डिंग मैदानावर राज्यस्तरीय चार मैदानी खेळांचा गट याठिकाणी घेतला होता.

शालेय विद्यार्थ्यांच्या कुस्ती, कबड्डी, खोखो अशा खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शाळेत विद्यार्थी असणारे सांगलीचे जयसिंग पाटील हा मुलगा मालवणात येऊन कबड्डी ,कुस्ती, खोखो खेळत मालवणची माती अंगाला लावतो व महाराष्ट्राच्या खोखो संघाचे कर्णधार बनतो . जी माती १९८३ साली त्यांनी कपाळाला लावली होती त्याच माती मध्ये ३५ वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून जयसिंग पाटील यांनी काम केले या एक योगायोग होता असे सांगितले यावेळी सत्कारमूर्ती पाटील सर यांनी सेवानिवृत्त होतोय त्याचा थोडासा आनंदही वाटतोय आणि दुःख ही होते. कारण एवढी वर्षे येथे काम केल्यानंतर कंठ दाटून येतोच कर्मभूमी आणि जन्मभूमी मध्ये जरी अंतर असले तरी शेवटी आपल्याला जन्मभूमीकडे जावेच लागते तशी माझी आता अवस्था आहे या मातीतील माणसानी आपल्याला भरपूर प्रेम दिले ते आपण विसरू शकत नाही असे सांगितले

You cannot copy content of this page