बांदा/प्रतिनिधी सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेली येथील स्पंदन युथ फौंडेशनच्या वतीने सावंतवाडी संस्थांनाचे युवराज लखमराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया युवराज लखम राजे यांनी दिली. .
यावेळी युथ फौंडेशन चे संस्थापक सिद्धेश महाजन, तेजस परब, केदार कणबर्गी, गोविंद प्रभू, अभिषेक देऊलकर, प्रशांत परब आदी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन युवराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
