बांदा शाळेत साजरा होणार शिवराज्यभिषेक

६ रोजी शेवतेज सेवा संस्थेचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी शिवविचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्यासाठी काम करत असलेल्या येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक ६ रोजी बांदा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हंबीरराव मोहिते फेम ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८ वाजता पुरोहितांच्या उपस्थितीत अभिषेक केल्यानंतर पारंपारीक पद्धतीने शिवराज्याभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेते अनिल गवस हे उपस्थिताना शिवविचारांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिवप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page