नील बांदेकरचे दुहेरी यश

बांदा ता.०२-:* नुकत्याच शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शाहू वेशभूषा स्पर्धेमध्ये येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेचा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने लहान गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. अष्टपैलू संस्कृती मुंबई या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत देखील नील बांदेकर याने लहान गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

नील हा केंद्र शाळा नंबर 1 मध्ये, इयत्ता चौथी मध्ये शिकत असून शाळेतील समस्त शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांचे त्याला अनमोल असे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, बांदा सरपंच अक्रम खान आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फोटो :- नील बांदेकर.

You cannot copy content of this page