मोटारसायकल धडक बसून पादचारी गंभीर जखमी

मळगाव रेल्वे स्टेशन येथील घटना; कुत्रा आडवा आल्याने झाला अपघात

सावंतवाडी ता.२६-:* कुत्रा आडवा आल्याने भरधाव मोटारसायकलची धडक पादचाऱ्यांना बसल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले हा अपघात पावणे नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात घडला. रेल्वे स्टेशन दिशेने वडखोल येथिल मोटारसायकल स्वार भरधाव वेगात जात असताना अचानक कुत्रा आडवा आला यावेळी कुत्र्याला वाचविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या तेथीलच नाबर नामक वयोवृद्ध पादचाऱ्यांना मोटर सायकलची जोरदार धडक बसली यात पादचाऱ्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे, मळगाव शिवसेना उपविभाग प्रमुख महेश शिरोडकर, पोलीस पाटील अजित वैज, राज सोनुर्लेकर आदीनी मदतीसाठी धाव घेतली.

यावेळी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून दोघांनाही अधिक उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची समस्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे या ठिकाणी असलेल्या कुत्र्यापासून अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

You cannot copy content of this page