बाळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता आताच्या शिवसेनेत नाही…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घणाघाती टीका; उद्धव ठाकरेंनी केली हिंदुत्वाशी गद्दारी….

मालवण ता.२२-:* उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी करून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून राज्यात सत्ता उपभोगत आहेत. बाळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता आताच्या शिवसेनेत नाही अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी येथे बोलताना केली. यावेळी राणे यांनी विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यात महाराष्ट्र मागे पडत आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपची सत्ता कायम राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार फंडातून दिलेल्या एक कोटी रुपये खर्चाच्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मोहन कुबल,महेश सारंग दाजी सावजी, भाई मांजरेकर, चित्रपट आघाडी महिला जिल्हाध्यक्षा सौ. नमिता गावकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर, हरीश गावकर फादर संजय, आदी व इतर उपस्थित होते. यावेळी देवबाग ग्रामस्थांच्या वतीने ना. नारायण राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देवबागचे मनोज खोबरेकर यांनीही बंधाऱ्याच्या कामास निधी दिल्याबद्दल ना. नारायण राणे यांचे विशेष स्वागत केले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, मी १९९० मध्ये आमदार बनल्या नंतर देवबागचा बंधारा आणि रस्ता करून देत देवबाग गावाला सागरी अतिक्रमण व स्थलांतरापासून वाचवले. येथील बंधाऱ्याला आणि रस्त्याला इतिहास आहे. येथील ग्रामस्थांचे रक्षण व्हावे या माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी हे काम केले.

आजही या बंधाऱ्याच्या दुरुस्ती साठी मी माझ्या खासदार फंडातून पैसे दिले आहेत. इथल्या आमदाराला गेल्या आठ वर्षात देवबागचा बंधारा का दिसला नाही असा सवाल करून नारायण राणे म्हणाले, टीका ही आपल्या बरोबरीच्या माणसावर केली पाहिजे. इथल्या आमदाराला विधानसभेत साधं बोलता येत नाही, भाषण करता येत नाही, विधानसभेत प्रश्न मांडता येत नाही. अशा आमदाराला निवडून दिले ही तुमची चूक आहे. माझ्या पराभवानंतर इथल्या आमदाराचे जायंट किलर म्हणून फोटो झळकवले गेले, पण त्यांचा फोटो पाहून मुंगी सुद्धा घाबरत नाही.

इथल्या जनतेने माझा पराभव केला तरीही मालवण हा माझा आवडता तालुका आहे. जनतेला अडचणी येतात तेव्हा शिवसेनावाले कुठे दिसत नाहीत, तेव्हा राणेच जनतेला लागतात. संकटात कोण धावून येत हे पाहून जनतेने मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले राणे पुढे म्हणाले, मागील आठ वर्षे वैभव नाईक येथील आमदार आहेत. मग आठ वर्षे देवबागात पाऊस पडत होता, पूर येत होता, तो आमदाराला दिसला नाही काय? असा सवाल करून इकडचा आमदार हा ” आमदार” नाही लोकांचे पैसे लुटणारा “लुटारू” आहे. प्रत्येक कामात त्याची टक्केवारी असते. आजपर्यंत त्याने कोट्यवधी रुपये कमवले, मग स्वतःचे किमान एक कोटी रुपये घालून ग्रामस्थांना बंधारा का बांधून दिला नाही? असेही राणे म्हणाले ना.,राणे पुढे म्हणाले, या भागाचा विकास करण्यासाठी जेव्हा मी पावले उचलली तेव्हा विकासकामात विरोध करण्याचे, आडकाठी आणण्याचे काम शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केले.

विमानतळाला विरोध करणारे विनायक राऊत विमानतळाच्या उद्घाटनाच्यावेळी हातात माईक घेऊन विमानतळ झाल्याबद्दल शिवसेनेचे, मुख्यमंत्र्यांचे गुणगान गात होते. मुख्यमंत्री कोणाला भेटत नाहीत, त्यांना सरळ उभे राहता येत नाही, चालता येत नाही, असे मुख्यमंत्री लोकांना काय निधी देणार ? असा सवालही त्यांनी केला नारायण राणे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात विकासाचं केलेलं एक काम सांगावं.

आज गुजरात, तामिळनाडू ही राज्य महाराष्ट्रापुढे गेली आहेत. दरडोई उत्पन्नात तामिळनाडू, गुजरात पुढे गेला आहे. अगदी दरडोई उत्पन्नात गोवा सुद्धा पुढे आहे. साडेचार लाख रुपये त्यांचे दरडोई उत्पन्न आहे. तर सिक्कीमचं ४ लाख १० हजार दरडोई उत्पन्न आहे. पण महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न कमी होतंय. आज १ लाख ९४ हजार उत्पन्न आहे. यापूर्वी प्रगतशील महाराष्ट्र देशात वेगळा होता. पण आज चालवतय कोण ? असं सांगून राणेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करीत राणे म्हणाले, दुसऱ्यांच्या दिसण्यावर शिवसेना आमदार खासदार यांनी बोलू नये, विकासाववर बोलावे. आम्ही राणे कुटुंबीय सुखी आहोत, आम्हाला लोकांची सेवा करायची आहे, लोकांचे प्रेम आशीर्वाद आमच्यावर आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्य

You cannot copy content of this page